उदयन राजेंना शरद पवार यांचं ‘जाणता राजा’ विधानावरून प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे यांच्या ‘जाणता राजा’ या उपाधीवरील टिकेला प्रत्युत्तर दिलं.

‘मला जाणता राजा म्हणा, असं मी कधीच म्हटलेलं नाही. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी प्रचलित केला. ते शिवरायांचे गुरू नव्हते. राजमाता जिजाऊ य शिवछत्रपतींच्या गुरू होत्या. जाणता राजा ही समर्थांच्या लेखणीची कमाल आहे. छत्रपती हिच शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे.’ असं विधान शरद पवार यांनी केलं. ते खटाव- माण साखर कारखान्याच्या 251001व्या साखर पोत्याचं पूजन कार्यक्रमाला आले होते.

संबंधित बातम्या- Video : ‘पुन्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल बोलाल तर…’, छ. उदयनराजेंचा इशारा

काय म्हणाले होते उदयनराजे?

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकामुळे निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज असणाऱ्या उदयनराजे यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. जाणता राजा ही उपाधी लावण्यावरून त्यांनी शरद पवारांना कानपिचक्या दिल्या होत्या. त्यांच्या या विधानावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत शरद पवार हे जाणता राजाच आहेत, असं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या- ‘होय शरद पवार म्हणजेच जाणता राजा…’ जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर

Exit mobile version