Jaimaharashtra news

शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतलेल्या भेटीनं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. पवारांनी नवी दिल्लीत 10 जनपथवर सोनिया गांधींची भेट घेतली.

 

या बैठकीत राष्ट्रपतीपदासंदर्भात चर्चा झाल्याचं कळते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता जवळ आली. त्यातच डाव्यांनीही शरद पवारांचं नाव पुढे केलं होतं.

 

शरद पवारांनी मात्र आपण राष्ट्रपतीपदासाठी शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण मुरब्बी राजकारणी असलेल्या शरद पवारांनी मग सोनिया गांधींची भेट का घेतली याचं उत्तर मात्र मिळालेलं नाही.

Exit mobile version