Tue. Jun 28th, 2022

एलआयसीचे शेअर्स शेअर बाजारात सूचिबद्ध

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सरकारी विमा कंपनी ( एलआयसीचे) शेअर्स मंगळवारी शेअर बाजारात आले आहेत. मात्र शेअर बाजारात एलआयसीची सुरुवात चांगली झालेली दिसत नाही. एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठ्या घसरणीसह ८६२ वर सुरु झाली आहे. परंतु त्यांनंतर हळूहळू खरेदीदारांची संख्या वाढल्याने सकाळी १०.२५ मिनिटांपर्यंत एलआयसीचा शेअर ४५.४० अंकांच्या म्हणजेच ४.७८ टक्क्यांच्या घसरणीसह ९०३.६० वर ट्रेड करत होता. तत्पूर्वी सकाळी ग्रे मार्केटमध्ये शून्यापेक्षा खालच्या प्रीमियमवर ट्रेडिंग केल्यानंतर, एलआयसीचे शेअर्स बीएसईवर प्री-ओपन सत्रात १२ टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत होता. प्री-ओपनमध्ये, एलआयसीच्या स्टॉकने पहिल्या दिवसाची सुरुवात १२. ६० टक्के किंवा ११९.६० रुपयांच्या तोट्यासह ८२९ रुपयांवर केली आहे. एखाद्या कंपनीचा समभाग शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यापूर्वी त्याचे अनधिकृत ट्रेडिंग होणारी व्यवस्था म्हणजे ग्रे मार्केट असते. ग्रे मार्केटमध्ये त्या कंपनीचा समभाग अनधिकृतरीत्या खरेदीसाठी ट्रेडर्सकडून उपलब्ध केला जातो.

एलआयसीचा हा पहिला इश्यू भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे सिद्ध झाले आहे. या आयपीओ साठी किंमत ९०२-९४९ रुपये निश्चित करण्यात आली होती. प्रथमच, वीकेंडच्या दोन्ही दिवशी आयपीओ खुला राहिला आहे. विक्रमी ६ दिवस खुल्या असलेल्या एलआयसीच्या आयपीओला जवळपास प्रत्येक श्रेणीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रे मार्केट मध्ये एलआयसी आयपीओचा प्रीमियम लिस्ट होण्यापूर्वी शून्याच्या खाली गेला आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तोटा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.