काळा पैसा लपवल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दोषी; पदावरुन हटवले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
काळा पैसा लपवल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
पनामा पेपर लीक प्रकरण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दोषी ठरले असून, नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. काळा पैसा लपवल्याच्या शरीफ यांच्यावर ठपका आहे.
काळा पैशांचा स्त्रोत सांगू न शकल्याने शरीफ दोषी ठरले आहेत.
पंतप्रधानपदी असताना शरीफ यांची लंडनमध्ये संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्या
तपासासाठी सर्वोच्च न्यायालयानं संयुक्त तपास पथक बनवलं होते. या पथकानं शरीफ आणि त्यांच्या
कुटुंबाविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस केली होती.