Mon. Dec 9th, 2019

‘शिवाजी महाराज ग्रेट होते’, शशी थरूर यांचे मराठा साम्राज्याबद्दल गौरवोद्गार!

काँग्रेस खासदार शशी थरूर हे आपल्या लेखन आणि इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे Twitter वर नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी काही काळापूर्वी लिहिलेलं ‘Era of Darkness’ हे पुस्तकही चांगलंच गाजलं. इंग्रजांनी भारताचं नुकसान केलं असून ते नसते, तरीही भारताचा विकास झाला असता अशी भूमिका त्यांनी या पुस्तकात मांडली होती. एवढंच नव्हे, तर इंग्लंडमध्ये सिनेटसमोर इंग्रजांनी भारतीयांची माफी मागावी, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. मात्र याच विषयावरील व्याख्यानात शशी थरूर यांचं एक वक्तव्य मात्र महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शशी थरूर यांनी आपल्या भाषणात गौरवोद्गार काढले आहेत.

काय म्हणाले मराठ्यांविषयी थरूर?

शशी थरूर यांना एका कार्यक्रमादरम्यान इंग्रजांचं राज्य नसतं, तर भारतात काय असतं, असं विचारण्यात आलं.

यावर उत्तर देताना शशी थरूर म्हणाले, जर इंग्रज नसते, तर भारतावर मराठ्यांचं राज्य असतं.

देशात मराठ्यांनी आपल्या साम्राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार केला होता. त्यामुळे इंग्रजांचं राज्य नसतं, मराठेच देशाचे राजे असते, असं थरूर म्हणाले.

शिवाजी महाराज ग्रेट राजे होते!

या कार्यक्रमातच शिवाजी महाराजांचंही त्यांनी भरभरून कौतुक केलं.

भारतात मराठा साम्राज्य असताना धार्मिक सहिष्णुता होती.

युद्धादरम्यान कुराण सापडल्यावर त्यांनी ते मुस्लीम व्यक्तीकडे हाती देत. मुस्लीम व्यक्ती भेटेपर्यंत ते कुराणही ते आदरपूर्वक जपत.

अशी माहिती शशी थरूर यांनी या व्याख्यानात देऊन शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले.

या व्याख्यानाचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला. महाराष्ट्रभरात हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *