Fri. Aug 12th, 2022

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

 

राजकीय नेत्यांसह आता कलाकारही निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांनी भाजापत प्रवेश केला तर बुधवारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे सध्या राजकीय नेत्यांसारखेच कलाकारही निवडणुकींसाठी सज्ज झाले आहेत. आता अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा आज कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. दिल्लीमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश –

अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा हे आज कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेस करणार आहे.

दिल्लीमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा करण्यात येत होती.

सिन्हा यांनी विरोधी पक्षांच्या सभेत सामील झाले असून त्यांनी भाजपाच्या विरोधात भाषणही केले होते.

त्यांच्या या भाषणेमुळे भाजपावर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच भाजापाने तिकीट त्यांना तिकीट दिले नसल्याचे म्हटलं जात आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलल्यामुळे सिन्हा अमित शाह यांच्यावर नाराज झाले होते.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे सिन्हा यांनी कौतुक केले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा मोदींवर टीकाही केली आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.