Thu. Jun 20th, 2019

सोशल मीडियाद्वारे ‘तिने’ कमवले चक्क १७ दिवसांत ३५ लाख

0Shares

झटपट पैसे कमवण्याच्या नादात सोशल मीडियावर फेक मेसेज पाठवून लोकांची फसवणुक केली जात आहे.असाच एक प्रकार UAE मध्ये घडला आहे.एका युरोपियन महिलेने सोशल मीडियावर स्वत:चे फेक अकाऊंट तयार केले. या अकाऊंटच्या माध्यमातून आपण घटस्फोटीत असून मला आर्थिक मदतीची गरज असल्याची खोटी बतावणी केली. या महिलेने चक्क 17 दिवसांमध्ये 35 लाख रुपये जमा केल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडलं ?

सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज शेअर केले जातात.

या फेक मेसेजद्वारे लोकांची फसवणुक करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.

यूएईमध्ये राहत असलेल्या एका महिलेने अशीच एक खोटी बतावणी करत फसवणुक केल्याचे समोर आले आहे.

ही महिला यूएईची नसून युरोपियन असल्याचे समजते आहे.

आपण घटस्फोटीत असल्यामुळे आर्थिक गरज असल्याचे महिलेने सोशल मीडियावर म्हटलं आहे.

तिच्या लहान मुलांचे फोटो शेअर करून ती मदत मागत असल्याचे समजते आहे.

या महिलेने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर फेक अकाऊंट तयार केले.

या मागणीतून तिने चक्क १७ दिवसांमध्ये ३५ लाख रुपये कमवले आहेत.

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: