Jaimaharashtra news

वीज पडून 70 शेळ्या आणि मेंढरांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मावळ

 

राज्यात काही भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाउस सुरु आहे. मावळ तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

 

मावळ मधील सुदवडी गावात  भंडारा डोंगराच्या पायथ्याशी  वीज पडून 70 शेळ्या आणि मेंढरांचा मृत्यू झालाय.

 

वीज पडून शेळ्यांचा मृत्यू झाल्याने लाखोंचं नुकसान झाले. धनगर समाजातील लोकांच्या या शेळ्या होत्या. आज सकाळी पंचनामा करून तळेगाव एमआईडीसी पोलीस

स्टेशनमध्ये आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली.

Exit mobile version