Fri. Aug 6th, 2021

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी शेकाप कार्यकर्त्यांनी वाटले पैसे

epa06168186 Unseen Indian man arranges new currency notes of 200 rupees, in Bangalore, India, 28 August 2017. The Reserve Bank of India recently introduced two new denomination notes of Rs 50 and Rs 200. While the new Rs 50 note is fluorescent blue in color and Rs 200 note is bright yellow and entered the banking system. EPA-EFE/JAGADEESH NV

लोकसभा निवडणुकांचा देशातील चौथा टप्पा आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. राज्यातील १७ मतदारसंघात तर देशातील ७१ जागांवर मतदान पार पडणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पैसे वाटप करत असल्याचे समजते आहे. शेकापच्या कार्यकर्त्यांना पार्थ पवार यांचा प्रचार करण्यासाठी पैसे वाटत असल्याची माहिती पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने त्यांना पकडले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पैसे वाटणाऱ्या पकडले आहे.

पैसे वाटणारे शेकापचे कार्यकर्ते असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.

सुकापूर येथील मतदारांना प्रत्येकी २०० रुपये वाटत असल्याचे पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडले असल्याची माहिती दिली आहे.

२०० रुपयांची अशी २१ पाकिटे जप्त केले असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने यांनी दिली.

राज्यातील १७ मतदारसंघात मतदान होणार असून यावेळी मावळ मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे.

मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे पार्थ पवार vs शिवसेनेचे श्रीरंग बारणे अशी लढत होणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *