Wed. Oct 5th, 2022

शिखर धवन World Cupमधून बाहेर; दुखापतीमुळे निर्णय

LONDON, ENGLAND - MAY 25: Shikhar Dhawan of India walks off after being dismissed by Trent Boult of New Zealand during the ICC Cricket World Cup 2019 Warm Up match between India and New Zealand at The Kia Oval on May 25, 2019 in London, England. (Photo by Jordan Mansfield/Getty Images)

World Cup 2019 सुरू असून भारताने आतापर्यंत चार सामने खेळले आहे. या चार सामन्यांपैकी तीन सामना जिंकले असून न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात पावसामुळे 1-1 गुण देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे धवन पुन्हा WorldCupच्या मैदानात उतरणार नसल्याचे त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

काय म्हणाला शिखर धवन ?

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनाला ऑस्ट्रलियासोबत झालेल्या सामन्यात खेळताना अंगठ्याला दुखापत झाली.

ऑस्ट्रेलियाविरोधात फलंदाजी करताना पॅट कमिन्सचा चेंडू शिखरच्या अंगठ्याला लागला.

शिखरच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्या हाताला प्लास्टर घालावे लागले होते.

शिखरला दुखापत झाल्यामुळे BCCIने त्वरीत रिषभ पंतला धवनची दुखापत बरे होईपर्यंत इंग्लंडला पाठवले.

मात्र शिखरची दुखापत बरी होत नसल्यामुळे BCCI ने अखेर अधिकृतपणे खेळणार नसल्याचे जाहीर केले.

याबाबत शिखरने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

‘The show must go on …’ असे त्याने ट्विटमध्ये म्हणत सगळ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.