Tue. Aug 3rd, 2021

World Cup 2019 : धवनला दुखापत पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा धुरा सांभाळणाऱ्या सलामीवीर व तडाखेबाज फलंदाज शिखर धवनला पुढील तीन आठवडे  मैदानाबाहेर राहावं लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नाथन कुल्टरचा एक उसळता चेंडू त्याच्या हाताला लागल्यामुळे त्याच्या अंगठ्याला मार लागला आहे.त्यामुळं 13 जूनला न्यूझीलंड आणि 16 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही आहे. त्याच्या गैरहजेरीत के. एल. राहुल भारताच्या डावाची सुरुवात करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

शिखर धवनला पुढील तीन आठवडे मैदानाबाहेर

भारतीय क्रिकेट संघाला मोठा फटका बसला आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर व तडाखेबाज फलंदाज शिखर धवनच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नाथन कुल्टरचा एका उसळता चेंडू त्याच्या हातावर आदळला आणि त्याच्या अंगठ्याला मार लागला.

अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी उतरू शकला नाही.त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजानं क्षेत्ररक्षण केलं.

सामन्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे.त्यामुळं त्याला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली आहे.

त्यामुळं 13 जूनला न्यूझीलंड आणि 16 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.

त्याच्या गैरहजेरीत के. एल. राहुल भारताच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *