Sat. Oct 1st, 2022

शिल्पा शेट्टीचं तब्बल 12 वर्षांनी सिनेमात ‘कमबॅक’

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 12 वर्षांनी मोठ्या पडद्यावर अभिनयाच्या दुनियेत ‘कमबॅक’ करतेय. दिलजीत दोसांज आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आगामी सिनेमात शिल्पा शेट्टीही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. 2007 साली शिल्पा शेट्टी ‘अपने’ या सिनेमात शेवटची पाहायला मिळाली होती.

शिल्पा शेट्टी अभिनय क्षेत्रापासून दूर असली, तरी प्रसिद्धीपासून दूर नव्हती.

ओम शांती ओम सिनेमातील गाण्यात अनेक कलाकारांसोबत तिने विशेष उपस्थिती दाखवत छोटा डान्स परफॉर्मंस दिला होता.

तसंच दोस्ताना सिनेमातील ‘शट अप अँड बाऊन्स’ या गाण्यात तिने आपला जलवा दाखवला होता.

मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी शिल्पा शेट्टी आपल्या योगाच्या व्हिडिओजमुळे चाहत्यांसमोर होती.

छोट्या पडद्यावरही सुपर डान्सर या डान्स रिऍलिटी शोमध्येही ती जजच्या भूमिकेत लोकांच्या पसंतीस उतरली.

मात्र हे सर्व काम ती आपलं कुटुंब- परिवाराला वेळ देऊन फावल्या वेळात करत असल्यामुळे तिने मोठ्या पडद्यावर अभिनय करणं टाळलं.

मात्र आता तब्बल 12 वर्षांनी ती अभिनयाकडे वळली आहे.

या सिनेमाचं नाव जरी घोषित करण्यात लं नसलं, तरी या सिनेमाचं दिग्दर्शन अजिझ मिर्झा यांचा मुलगा हारून करणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्याचा हा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न असणार आहे. यापूर्वी त्याने ‘राजू बन गया जंटलमन’, ‘यस बॉस’, ‘पहेली’ या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.