शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मितीप्रकरणी अटक

मुंबई: शिल्पा शेट्टी यांचे पती आणि प्रख्यात उद्योगपती राज कुंद्रा यांना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने चौकशीसाठी बोलावले आहे. अद्याप गुन्हे शाखेच्या पथकाने याबाबत अधिक माहिती जाहीर केली नसली तरी राज कुंद्रा यांचे नाव एका खटल्यात पुढे येत आहे, ज्याच्या चौकशीसाठी त्याला बोलविण्यात आले आहे.फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या पथकानं मढ इथल्या ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. याठिकाणी अश्लील चित्रपटांचं चित्रीकरण होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती.
राज कुंद्रा यांनी मात्र या प्रकरणात त्यांच्यावरील आरोप खोडून काढले आणि असे म्हटले की त्यांचा त्यांच्याशी काही संबंध नाही. तसेच त्यांनी असे म्हटले आहे की ज्या कंपनीने अश्लील व्हिडिओ बनविल्याचा आरोप आहे त्या कंपनीला त्याने सोडले आहे. त्याने कंपनी सोडून दिल्याची माहिती पोलिसांना आवश्यक कागदपत्रे देऊन दिली.सोमवारी जवळपास ७ ते ८ तास चौकशी केल्यानंतर संध्याकाळी कुंद्राला अटक करण्यात आली.
कोण आहेत ह्या अभिनेत्री:
अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.अभिनेत्री शेर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी महाराष्ट्र सायबर सेलला दिलेल्या जबाबात त्यांना आणणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तर राज कुंद्रा होता.