Thu. Sep 16th, 2021

शिल्पा शेट्टीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई : माध्यमांकडून चुकीच्या आणि बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचा दावा अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनं केला आहे. या संदर्भातल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. यूट्यूवर केलेली आक्षेपार्ह विधानं काढण्याचे निर्देश यावेळी उच्च न्यायालयानं दिले आहे. मात्र, प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाबाबत सरसकट कोणताही अंतरिम आदेश न्यायालयानं दिला नाही. राज कुंद्रा याचा सहभाग असलेल्या पॉर्न फिल्म प्रकरणाचे वार्तांकन करताना तथ्यहीन बातम्या देऊन प्रतिमा मलिन केली जात आहे. प्रसारमाध्यमांना त्याविषयीच्या वार्तांकनाला मनाई करावी आणि संबंधित माध्यमांना भरपाई देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती शिल्पा शेट्टी हिनं केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *