Tue. Aug 9th, 2022

शिंदे गट लवकरच मुंबईत

एकनाथ शिंदे हे गोव्यातील हॉटेलमध्ये आमदारांसोबत चर्चा करतील आणि नंतर ते मुंबईला रवाना होतील, अशी माहिती आहे.सरकार कोसळल्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात हालचालींना वेग आला असून आता नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये आपला वाटा कसा असावा, याबाबत खलबतं केली जाणार आहे. याबाबत शिंदे गटाची बैठक होणार आहे.

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले आहे. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे गट बुधवारी रात्री गोव्यातील ताज कन्व्हेंन्शन सेन्टर या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. गोव्यातून हे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. या बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपनं जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गटाची घरवापसी होणार आहे. महाराष्ट्रात वापसी झाल्यानंतर शिंदे गटाचा पुढचा प्लॅन काय असेल याच्या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.