Wed. Oct 5th, 2022

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत शिंदे विराजमान

महाराष्ट्रात गेल्या बऱ्याच दिवसापासून काही नाही काही राजकीय घडामोडी घडताना सगळ्यांनी पहिल्या आहेत. आधी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेगळंच वळण लागले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असतानाच चित्र पालटले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यंमत्री पदावर विराजमान होणार अशी घोषणा झाली. आणि शपथ विधी पार पडला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात फुलांची सजावट देखील करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आंनद दिघे, पंतप्रधान मोदी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला आहे.फुलांची सजावट करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात पोहचले आहेत. मुख्यमंत्र्यानं सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित होते. पूजा केल्या नंतर एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला पदभार .मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत शिंदे विराजमान झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.