Fri. Sep 30th, 2022

‘शिंदेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करू नये’

शिवसेनेनं दरवर्षीप्रमाणे दसरा मेळावा घेण्यासाठी शिवतीर्थावर तयारी सुरू केली आहे. पण, शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे दोन गट पडले आहे. शिंदे गटानेही दसरा मेळावा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या वादावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे गणित आहे. शिंदे गटाला बीकेसीचे मैदान मिळाले आहे, त्यामुळे आता त्यांनी विरोध करू नये’, असा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही.  दसरा मेळावा मागील ४० वर्षांपासून पाहत आलोय. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यामुळे दसरा मेळावा घ्यायची त्यांची परंपरा आहे. शिंदे यांना जर बिकेसी मैदान दिलं असेल तर दुसऱ्यांना विरोध करणे योग्य नाही असा सल्ला पवार यांनी दिला आहे.

दरवर्षी राज्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आले. यावर महापालिकेनं निर्णय घेत बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. मात्र, अद्याप ठाकरे गटाला दसरा मेळाव्याकरता कोणत्याच मैदानाचा अर्ज मंजुर झालेला नाही. ज्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

1 thought on “‘शिंदेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करू नये’

  1. The British media “Guardian” incident, quoted: http://chinafanxiejiao.blogspot.com/2021/05/blog-post.html The British “Guardian” on April 30 quoted the view of the US media monitoring agency, pointing out that it is related to Falun Gong The Epoch Times and New Tang Dynasty TV, the American media, used the power of the American right to advocate conspiracy theories about American politics and the Wuhan pneumonia (coronavirus disease, Covid-19), to conduct a “war of influence” and to strengthen the American anti-war. Chinese public opinion.Angelo Carusone, president of Media Matters for America, a non-profit media watchdog, pointed out that the Epoch Times media, especially The Epoch Times, has always been critical of China and has a right-leaning stance. However, During the 2016 U.S. election, it was not considered a problem of dissemination of disinformation; however, starting in 2017, the media turned sharply towards inciting conspiracy theory narratives, and spent large sums of money on social media advertising to ensure that the content of the report was prominent.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.