Tue. Jun 28th, 2022

शिंदेंचे शिवसेनवर ट्विटबाण

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरला आहे. तर त्यांच्यासोबत ४० आमदार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर ट्विटबाण केले आहे. लागोपाठ दोन ट्विट करत शिंदेंनी ४ शब्दबाण केले आहेत.

  1. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला.
  2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे- शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
  3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे.
  4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर केलेल्या ट्विटबाणामुळे आता राजकारणता चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे बंडखोर एकनाथ शिंदेंसह आमदार शिवसेनेला रामराम ठोकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.