Jaimaharashtra news

परराज्यातील भाजीपाला राज्यात येऊ देणार नसल्याचा संपावर जाणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा निर्धार

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

शेतकरी संपाबाबत शिर्डीच्या पुणतांब्यात आज बैठक घेण्यात आली.

 

रघुनाथदादा पाटील, जयाजी सूर्यवंशी, शेतकरी  यांच्या उपस्थित या बैठकीला सुरुवात झाली होती.

 

संपाच्या नियोजनासाठी पुणतांबा येथे राज्यव्यापी समन्वय समितीने बैठक घेतली.

 

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्यव्यापी समन्वय समितीने ही बैठक बोलावली होती.

 

1 जुनअधी शासनाने या मागण्या पूर्ण नाही केल्या तर राज्यातील शेतकरी संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी या बैठकीत घेतला.

 

1 जूननंतर परराज्यातील भाजीपाला राज्यात येऊ देणार नसल्याचाही निर्णय शेतकऱ्यांनी घेतला.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या 

– शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा

– स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी

– शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा

– शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर पेंशन योजना लागु करावी

– दुधाला प्रतिलीटर 50 रुपये भाव मिळावा

– शेतीसाठी अखंडीत आणि मोफत वीजपुरवठा करावा

– ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 100% अनुदान मिळावे

Exit mobile version