Tue. Mar 9th, 2021

#Coronavirus : कोरोनाशी झगडण्यासाठी ‘साई संस्थान’ सज्ज

जगभर हाहकार पसरवलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही शिरकाव केलाय. जगभरातून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविक येत असलेल्याने शिर्डीतही चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाही आता दक्ष झाल असून शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयातही आवश्यकता पडल्यास एक वॉर्ड तयार करण्याची तयारी साई संस्थानने केली आहे.

‘सबका मालिक एक’चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज लाखो भाविक शिर्डीत येतात. त्याचबरोबर विदेशी भक्त ही साईंच्या दर्शानासाठी हजरी लावत असल्याने चिंतेचे वातवरण निर्माण झालं आहे. साई संस्थानने आता कोरोना व्हायरसला भाविकांनी घाबरून न जाण्याचं आहवान केलं आहे. साई संस्थानाकडून स्वच्छतेची काळजी घेतली जातेय. पुढे आवश्यकता पडल्यास संस्थानाच्या रुग्णालयात एक लॉर्ड राखीव ठेवण्याच्या दृष्टीने साई संस्थानाने तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी माहिती दिली आहे.

साई संस्थानने कोरोना व्हायरसच्या चिंतेपोटी ‘साई प्रसादलय’, ‘मंदिर परिसर’, ‘साईनाथ रुग्णालय’ तसंच ‘साईबाबा हॉस्पिटल’ या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. त्याच बरोबर आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेले भाविकही आपली काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आज अनेक भाविक आपल्या चेहऱ्याला मास्क बाधून मंदिर परिसरात आलेले होते. गेल्या पंधरा दिवसात शिर्डीला पाच लाखांच्या वर भाविकांनी भेट दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याने नागरीकांनी आणि भाविकांनी घाबरुन जाऊ नये, असं अवाहन करण्यात येतंय. मात्र स्वच्छतेबाबत काळजी नेहमी घेण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *