Jaimaharashtra news

म्हणून शिर्डीच्या साई संस्थानने राज्य सरकारला देऊ केलेत पाचशे कोटी रूपये

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

शिर्डीतील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी साई संस्थानने राज्य सरकारला पाचशे कोटी रूपये देऊ केले आहेत.

 

नीलवंडे धरणातून कॅनॉल आणि पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यासाठी हे पाचशे कोटी रूपये देऊ केले आहेत.

 

साईबाबा संस्थानच्या विश्वस्थ मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जवळपास 70 ते 80 किलोमीटरचे कॅनॉल खोदून पाईप लाईन टाकली जाणार आहे.

 

त्याद्वारे नीलवंडे धरणातून पाणी शिर्डीत आणले जाणार आहे. याचा फायदा अकोले-संगमनेरमधील शेतकऱ्यांना होणार आहे.

 

पिण्याच्या पाण्याला निश्चित प्राधान्य असले तरी धरण आणि पुनर्वसनासाठी जमिनींचा त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय? या पेचात सरकार निश्चित असणार आहे.

Exit mobile version