Jaimaharashtra news

शिर्डीत साई भक्तांना मोफत वाय-फाय

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

आजकाल सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय फाय सुविधा पुरवण्यात येते. त्यात आता शिर्डी संस्थानचीही भर पडली.

 

शिर्डीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत इंटरनेटचा लाभ घेता यावा यासाठी फ्री वाय-फाय सुविधेचा शुभारंभ आज करण्यात आला.

 

साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी या योजनेचा आज शिर्डीत शुभारंभ  केला. साई बाबा संस्थान, मंदिर, प्रसादालय आणि भक्ती निवासात ही सुविधा पुरवण्यात

येणार.

Exit mobile version