चोरट्यांचा हैदोस, एका रात्रीत फोडली 13 दुकानं

कोल्हापूर : चोरट्यांनी हैदोस मांडला आहे. कोल्हापुरात एका रात्रीत तब्बल 13 दुकानं फोडल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील शिरोळ परिसरातील ही घटना आहे. हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
कोल्हापुरातील शिरोळ बाजापेठेतील एका पाठोपाठ एक असलेल्या दुकानात चोरट्यानी शटर उचकटून प्रवेश केला. सोबतच चोरट्यांनी दुकानात असलेला लाखोंचा मुद्देमाल देखील लंपास केलाय. या प्रकारामुळे दुकानदारामध्ये घबराट पसरली आहे.
आपल्या दुकानात चोरी झाल्याचे समजताच दुकानदारांनी पोलीस ठाणे गाठले. तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.