शिरसाटांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बंडखोरांना समोर येऊन संवाद साधा असे आव्हान त्यांनी केले आहे. परंतु या संवादात आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही अशी टीकासुद्धा संजय शिरसाटांनी पत्रात लिहिली आहे. या पत्राच्या माध्यमातून आमदारांच्या मनातील खंत व्यक्त करण्यात आली आहे.
संजय शिरसाटांच्या पत्रात काय लिहिले होते ?
१.बुधवारी खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याची दार उघडली होती.
२. मध्यस्थांमुळे मुख्यमंत्र्यांना भेटता येत नव्हते.
३. मुख्यमंत्री कधी मंत्रालयात गेलेच नाहीत अशी टीका करण्यात आली.
४. बडव्यांमुळे आमची व्यथा किंबहुना तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल अशी आशंका त्यांनी व्यक्त केली आहे.
५. अशावेळी आमची सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते.
६. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते. तरीही आमच्यावर अविश्वास दाखवला गेला.
मुखमंत्र्यांना पत्रात विचारलेले प्रश्न
१. आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का ?
२. हिंदुत्व, अयोध्या, राममंदिर हे मुद्दे शिवसेनेचेच आहेत ना ? मग तुम्ही आम्हाला अयोध्येला जाण्यापासून का रोखले ?
३. विधानपरिषद निवडणुकीत आमच्यावर एवढा अविश्वास का दाखवला ?
४. विरोधकांनाच निधी कसा मिळतो ? त्यांचीच काम कशी होतात ?