Mon. Aug 8th, 2022

राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारे शिवजयंती साजरी करण्यात आली.

तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये शिवजयंती निमित्त अनेक साहसी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.

बीड

बीडमध्ये मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. राज्यात पहिल्यांदाच बीडमध्ये शिवाजी महाराजांना पोलीस दलाकडून पोलीस बँड पथकाने मानवंदना दिली.

अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. डीजे न लावता आणि इतर खर्च न करता ही शिवजयंती साजरी केली.

या शिवजयंती उत्सवात नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

पुणे

पुण्यात शिवजयंती निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केलं होतं. लाल महालात शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल 85 स्वराज्य रथांचा सहभाग हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरत आहे.

यानिमित्ताने महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करुन मिरवणुकीत सहभागी झाले.

अनेक चित्त थरारक प्रात्यक्षिकं यावेळी करण्यात आली. ही साहसी प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करण्यात आली.

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. मिरवणुकीचे यंदाचे हे आठवे वर्ष होते.

यामध्ये पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या.

औरंगाबाद

शिवाजी महाराजांच्या ३९० वी जयंती राज्यात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने औरंगाबादमध्ये शिव जन्म उत्सवाचा देखावा सादर करण्यात आला होता.

औरंगाबाद शहर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

कोल्हापूर

शिवजयंतीनिमित्त कोल्हापुरात सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयांमध्ये बुधवारी सकाळपासून विक्रमी सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमात 400 विद्यार्थी सहभागी झाले होते. या 400 विद्यार्थ्यांनी 40 मिनिटांमध्ये 1 लाख 4 हजार 444 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला.

390 व्या शिवजयंतीचा देशभरात उत्साह

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.