Mon. Aug 15th, 2022

नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आरती करण्यात आली. यावेळेला ढोलताशा पथकाचे वादन आणि शिवकालीन क्रिडा प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

पाहा हा व्हिडिओ :

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो शिवभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडवर येतात. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा ३४८ वर्धापन दिन साजरा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.