Wed. Dec 11th, 2019

मुख्यमंत्री पदावरून युतीची निव्वल रस्सीखेच – बाळासाहेब थोरात

काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार असून सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरून वाद उफळून आला आहे. मुख्यमंत्री पदावरून युतीत सुरू असलेली रस्सीखेच निव्वळ नाटक असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. पाच वर्ष एकामेंकावर टीका केल्यानंतर लोकसभा निवडणुकांदरम्यान गळाभेट करताना पाहिले आहे. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री कोण असेल हे जनता ठरवेल असेही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पदावरून निव्वळ रस्सीखेच –

विधानसभा निवडणुका पार पडणार असून सध्या युतीत मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला आहे.

या कारणांवरून विरोधक युतीवर टीका करत आहे.

मुख्यमंत्री पदावरून युतीत सुरू असलेली रस्सीखेच निव्वळ नाटक असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

पाच वर्षा एकामेंकावर टीका केल्यानंतर लोकसभा निवडणुकांदरम्यान गळाभेट करताना पाहिले आहे.

त्यामुळे गोष्टीवरून भांडण्याऐवजी आगामी मुख्यमंत्री कोण असेल हे जनता ठरवणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.

युवासेना आदित्य ठाकरे यांच्यावर टीका –

आदित्य ठाकरे सध्या जनआशिर्वाद यात्रेवर असून बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.

आदित्य यांचं कॉलेजमध्ये आनंद घेण्याचे वय असून ते राजकारणात शिरत आहेत.

निवडणुकांची वेळ नसताना महाराष्ट्र दौरा करायला हवा होता.

शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावे हवे होते.

आता निवडणुकींच्या काळात महाराष्ट्र फिरत असल्यामुळे त्यात काही वावगं नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

तसेच महाराष्ट्रातील हिवरे बाजार, राळेगणसिद्धी या गावात आदित्य यांनी 4 दिवस रहावे असा सल्ला थोरातांनी दिले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *