Tue. May 17th, 2022

सभेपूर्वी शिवसेना आणि भाजपात ट्विटबाण

थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसीत शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली असून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सभेआधीच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात ट्विटबाण पाहायला मिळालं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र भाजप यांच्यात ट्विट सामना रंगला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल आहे. आणि भाजपाने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केले की, लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कूछ लोग भूल गये है, अंदाज हमारा, जय महाराष्ट्र! आज क्रांतिकारी दिवस!!

तर संजय राऊत यांच्या ट्विटला भाजपा महाराष्ट्रने प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट केले की, वह जिसने घर नहीं छोडा, वह क्या मैदान में उतरेगा, देखा तुम्हारा असली चेहरा, कोई बच्चा भी नहीं डरेगा |

दरम्यान, थोड्याच वेळात शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी शिवसेनेचे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ‘तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या, दात पाडायंच काम मी करून दाखवतो’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाजातले वाक्य ऐकू येत आहे. तसेच १४ मे रोजी मी अनेकांचे मास्क उतरवणार आहे, असेही ते मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.