Fri. Jul 30th, 2021

विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर यात्रांचा सुकाळ, राजकीय पक्ष सज्ज

विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.

विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दोन टप्यातील महाजनादेश यात्रेला अमरावतीपासून आज सुरुवात होत आहे. तर आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा गेल्या महिन्यापासून सुरु आहे, विरोधी पक्षाच्या यात्रा लवकरंच सुरु होणार आहे. मात्र जनता कुणाला जनादेश देते, आशीर्वाद देते ते बघाव लागणार आहे.

विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर यात्रांचा सुकाळ

भाजपा

महाजनादेश यात्रा

नेतृत्व– मुख्यमंत्री

1 जुलैपासून अमरावतीपासून दोन टप्यात सुरुवात ,या दरम्यान 104 सभा आणि 228 स्वागत सभा घेणार

उद्दीष्ट- सरकारसाठी दुसऱ्यांदा जनादेश मिळवणे

शिवसेना

जनआशीर्वाद यात्रा

नेतृत्व– आदित्य ठाकरे

18 जुलैपासून जळगावमध्ये यात्रेला सुरुवात, दोन टप्यात यात्रा

उद्दीष्ट– आदित्य ठाकरेचा नेतृत्व प्रस्थापित करणे

शिवसेना

माऊली यात्रा
नेतृत्व– आदेश बांदेकर

2 ऑगस्टला विक्रमगडपासून यात्रेला सुरुवात होणार

महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी

शिवस्वराज्य यात्रा
नेतृत्व– खासदार अमोल कोल्हे आणि उदयन राजे भोसले

उद्दीष्ट– सत्ताधाऱ्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रत्युतर देण

तारीख अजून निश्चित नाही

स्वाभिमानी

आक्रोश यात्रा

नेतृत्व– राजू शेट्टी

11 ऑगस्टनंतर यात्रेला सुरुवात होण्याची शक्यता

उद्दीष्ट– सरकारचं अपयश उघड करणे, शेतकऱ्याचं वास्तव मांडण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *