Mon. Aug 8th, 2022

शिवसेना नगरसेवकाची सरकारी कर्मचाऱ्याला लाथा-बुक्यांनी मारहाण

राजकीय नेत्यांकडून सरकारी किंवा अन्य खाजगी कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण होते. अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान कोल्हापूरमध्ये नगरसेवकाने सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर यांना शिवसेनेचे नगरसेवक अभिजित चव्हाण यांच्याकडून मारहाणीचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल होतं. त्यामुळे पालिकेचे आजचे कामकाज ठप्प झाले होेते.

आपटेनगर परिसरातील पाण्याच्या प्रश्नावरून चव्हाण आणि आटकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यातून आपटेनगर पंपिंग स्टेशनमध्ये कनिष्ठ अभियंता आटकर यांना अभिजित चव्हाण यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला चव्हाण यांच्यावर केला आहे.

या प्रकरणाचा तपास करून नगरसेवकावर कडक कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.