Wed. Jun 29th, 2022

‘आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको’

 ‘शिवसेनेत गद्दार आता कुणीही राहिला नाही.  कितीही फाटलं तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. अशीच मागे एकदा फाटाफूट झाली होती, त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. तो आज काय उद्या सुद्धा मला नको आहे’ असं म्हणत विधान परिषदेच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत नाराजांना सुनावलं.

शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर कडक इशारा दिला. ‘आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्या पेक्षा विचाराने भिजू. मी उद्याची निवडणूक आहे. मला निवडणुकीची चिंता नाही. हारजीत तर होतच असते. मी ठामपणे सांगतो आम्ही जिंकणारच आहोत. मागे राज्यसभा निवडणुकीत झालं ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटलं ते सगळं समोर आलंय. हळूहळू ते कळेलच, असं सूचक विधानही उद्धव ठाकरे यांनी केलं.

मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मी चिंता करत बसलो, तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलंय त्याचा उपयोग काय? हारजीत होतच असते. उद्या तर जिंकणारच आहोत. त्याची चिंता नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत आपलं एकही मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोणतं? तोही अंदाज लागला आहे. हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल. मला फाटाफुटीची शक्यता अजिबात वाटत नाही. आता शिवसेनेत असा गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.