Maharashtra

शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत सहा ठराव मंजूर

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. तसेच शिवसेना आणि अपक्ष आमदार मिळून ५० आमदार शिंदेंच्या बंडात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं असून महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेना भवनात पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली असून बैठकीत बंडखोर आमदारांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत सहा ठराव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच बंडखोर आमदारांना त्यांचा निर्णय घेऊ द्या, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या बैठकीतील ६ ठराव

१. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि कायम राहील


२. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर कार्यकारिणीचा विश्वास, पक्षात निर्णय घेण्याचे त्यांना सर्वाधिकार


३. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पक्षप्रमुखांना अधिकार


४. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कुणाला वापरता येणार नाही


५. शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाची बांधिलकी कायम राहील


६. आगामी पालिका निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकणार


शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, खासदार, आमदार उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले…

दरम्यान, संध्याकाळपर्यंत बंडखोर आमदारांवर कारवाई होणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच, ‘ज्यांना मते मागायची आहेत त्यांनी त्यांच्या बापाच्या नावाने मागावीत. बाळासाहेबांचे नाव कुठलाही गद्दार वापरू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

manish tare

Recent Posts

समीर वानखेडे यांची मलिकांविरोधात तक्रार

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच…

1 hour ago

‘लोक निवडून देतात ती घराणेशाही कशी?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका…

3 hours ago

मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना धमकी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच…

4 hours ago

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाला लागलेली कीड’

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित…

4 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

 देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये,…

4 hours ago

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं संबोधन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा…

20 hours ago