Wed. Oct 5th, 2022

नवी मुंबईतील महापालिकेत शिवसेनेला खिंडार

शिवसेनेला एका मागून एक धक्के बसत आहेत. आधी आमदारांनी बंड करत सरकार पाडलं. आता नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी शिंदे गटात जात असल्याचे चित्र समोर आले आहेत. आधी नागपूर मधील आमदार शिंदे गटात जाणार असे समोर आले त्यांनतर ठाण्यातील नगरसेवकांनी ठाकरेंना धक्का देत शिंदे गटाची वाट धरली. त्यापाठोपाठ शिवसेनेचे ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात सामिल झालेत. नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, किशोर पाटकर असे जेष्ठ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. या ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत.

त्यानंतर आता ठाण्या पाठोपाठ नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात सामिल झालेत. नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, किशोर पाटकर असे जेष्ठ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. यामध्ये ऐरोली मतदारसंघातील जवळपास ९० टक्के नगरसेवकांचा समावेश आहे. नवी मुंबईतील ३० नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे. विजय चौगुलेच्या माध्यमातून शिंदे गटाला पाठिंबा देण्यात आला आहे.

Shivsena | नवी मुंबईतील महापालिकेत शिवसेनेला खिंडार | Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.