Sun. Jan 16th, 2022

युतीसाठी शिवसेनेच्या भाजपसमोर ‘या’ चार अटी  

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत.

मात्र भाजपला मित्रपक्षांच्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.

त्यातच आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनेने युतीसाठी चार कठोर अटी भाजपसमोर ठेवल्या आहेत.

जाणून घ्या काय आहेत या अटी?  

 • विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत एकत्र घेण्यात यावी.
 • विधानसभा निवडणुकीनंतर पुढचा मुख्यमंत्री सेनेचा असेल.
 • लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला २५ जागा सोडल्या पाहिजेत.
 • विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेसाठी १५० जागा सोडाव्यात.

१६ पैकी नऊ मित्रपक्ष भाजपामधून बाहेर

 • यंदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १६ पैकी नऊ मित्रपक्ष भाजपामधून बाहेर पडले आहेत.
 • संसदेत अस्तित्व असलेले  सहाच पक्ष भाजपकडे उरले आहेत.
 • शिवसेना, अकाली दल, लोकजनशक्ती पार्टी, अपना दल, जनता दल युनायटेड आणि रिपाइं हे पक्ष  भाजपमध्ये आहेत.

अमित शहांसोबत  उद्धव ठाकरेंची  चर्चा

 • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली.
 • यावेळी अशा चार स्पष्ट अटी अमित शहांच्या समोर उद्धव ठाकरेंनी ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
 • लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात सेनेसारखा महत्त्वाचा मित्रपक्ष निसटून जाऊ नये, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.
 • महाराष्ट्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनेने घातलेल्या अटींची पूर्तता करणे भाजपला शक्य आहे का? हा प्रश्नचं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *