Sun. Jul 12th, 2020

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी शिवसेना नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

राजकीय नेत्यांमध्ये अनेक वाचाळवीर नेतेमंडळी आहेत. त्यातमध्ये अजुन नेत्यांची भर पडत आहे. या अशा नेत्यांमुळे पुर्ण पक्षच चर्चेत येतो. याआधी हिंजवडीतील भाजपचे नेते यशवंत भोसले यांचेही वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले होते. आता त्याच्या मागोमाग शिवसेनेचे नेते तसेच पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे. यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्याचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले होते.

या मेळाव्याचे उद्घाटन पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी बेरोजगार तरुणांसमोर मार्गदर्शन करताना हॉटेलला परमिट रूम केल्यास चार पटीने जोरात चालतंय, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे.

नक्की काय म्हणाले गुलाबराव पाटील ?

मी स्वतः हॉटेल भाड्याने घेतली होती. नंतर ती विकत घेतली. मी तिला शुद्ध शाकाहारी म्हणून चालवली तर ती चालेना. मग तिला मांसाहारी केली. पण मटन उरलं की दुसर्‍या दिवशी खपेना. अखेर मी तिला परमिट रूम केली मग ती हॉटेल जोरात चालू लागली.

मांसाहारी हॉटेलचा गल्ला 4 हजार रुपये होता तोच परमिटरूम ज्या दिवशी सुरू केले त्यादिवशी 20 हजार रुपये धंदा झाला. हॉटेलचा व्यवसाय चालत नव्हता तेंव्हा असे वाटले आपण फसलो.

पण एकाने सांगितले की परमिट रूम चालू कर आणि महिन्याला 60 ते 70 हजार रुपये मिळायला लागले. असे धक्कादायक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी सुशिक्षित बेरोजगार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *