Sun. May 31st, 2020

भाजपा – शिवसेना युतीवर रामदास आठवले नाराज

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा – शिवसेना युती झाली आहे.पण युतीतील आणखी एक मित्रपक्ष असणाऱ्या आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना – भाजपा युतीने दलित मतांना ग्राह्य धरु नये असा इशारा दिला आहे. आठवले यांनी युतीवर नाराजी व्यक्त केली आहे.तसेच तुम्ही आमचा आदर करा आणि आमच्याकडून आदराची अपेक्षा करावी असे ही त्यांनी शिवसेना- भाजपाला सुनावले आहे.

रामदास आठवले नाराज का?

राज्यात शिवसेना- भाजपा युती असून लोकसभा निवडणूक भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार आहेत.

जागावाटपावरुन रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाला दुय्यम स्थान दिले.

जागावाटपाचा हा निर्णय घेण्यापूर्वी एकदा आमच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते.असे ही म्हणाले आहेत.

मुंबई उत्तर पूर्व किंवा मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं ते म्हणाले आहेत.

निवडणुकीत आम्हाला किमान एक जागा आणि विधानसभा निवडणुकीत किमान आठ जागांची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *