Wed. Oct 5th, 2022

शिवसेना पक्षप्रमुखांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घ्यावी – अनिल बोंडे

प्रतिक्षेत असलेला विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा चमत्कार पाहायला मिळाला आहे. सर्वांचे लक्ष असलेल्या भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत झाली असून प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे. अशाप्रकारे, विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे सर्व ५ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे २, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा १ उमेदवार विजयी झाले आहेत.

दरम्यान, भाजप नेते अनिल बोंडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संघटनामुळे भाजपाला विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय मिळाला आहे. तसेच अनिल बोंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घ्यावी, अशी टीका बोंडे यांनी केली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड विजयी झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. तसेच काँग्रेसचा एक उमेदवार भाई जगताप विजयी झाले आहेत. मात्र, काँग्रेसचा दुसरे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.

कोणत्या उमेदवाराला किती मत?

भाजप उमेदवार

  • प्रवीण दरेकर २९
  • श्रीकांत भारतीय ३०
  • राम शिंदे ३०
  • उमा खापरे २७
  • प्रसाद लाड २८

शिवसेनेचे उमेदवार

  • सचिन अहिर २६
  • आमशा पडवी २६

राष्ट्रवादीचे उमेदवार

  • एकनाथ खडसे २९
  • रामराजे निंबाळकर २८

काँग्रेसचे उमेदवार

  • भाई जगताप २६

काँग्रेसचे उर्वरित एक उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं मिळाली असून विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.

1 thought on “शिवसेना पक्षप्रमुखांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घ्यावी – अनिल बोंडे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.