Thu. May 6th, 2021

शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांच्या या भूमिकेचा घेतला समाचार

कोरोनामुळे राज्यात परिस्थित बिकट निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दररोज ५० ते ६० हजारांनी वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून संपूर्ण लॉकडाऊनची तयारी राज्य सरकार करत असल्याच चित्र दिसत आहे. येत्या १४ एप्रिलाल त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, विरोधी पक्षाने लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून अर्थचक्र बिघडेल आणि लोकांचा उद्रेक होईल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यानंतर शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांच्या या भूमिकेचा समाचार घेतला असून राज्यसरकार केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामना या वृत्तपत्रतून घणाघात भाजपवर हल्ला चढवला आहे. ‘नोटाबंदी, लॉकडाऊन याची ओळख पंतप्रधान मोदींनीच देशाला करून दिली आहे. वर्षभरापूर्वी मोदींनी केलेल्या लॉकडाऊनचं भाजप कार्यकर्त्यांनी थाळ्या वाजवून स्वागत केलं होतं. आज कोरोनाची परिस्थिती पुर्वीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे याचं भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षानं ठेवायला हवं. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी?,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे. तसेच गुजरात राज्यात भाजपची सरकार आहे. मात्र राज्यात असूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. उलट सुरत, अहमदाबादेत कोरोनाचं रुग्ण रस्त्यावर, फुटपाथवर पडेपर्यंत चित्र पाहयला मिळत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे या गंभीर परिस्थितीतही लॉकडाऊन लावायला तयार नाहीत. कारण व्यापारी मंडळींचं नुकसान होईल. व्यापाऱ्यांचा पक्ष फक्त व्यापाऱ्यांचाच विचार करीत असेल तर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही,’ असंही शिवसेनेनं सुनावलं आहे.

लॉकडाऊनमुळे ज्या गोरगरीबांचे पोट मारले जाणार आहे, त्यांना जगण्यापुरती आर्थिक मदत करावी व अशा गरजूंच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हावी ही सूचना चांगली आहे व त्या कामी केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारला सढळ हस्ते मदत करावी लागेल. केंद्र सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, पळ काढता येणार नाही. शेवटी देश मोदींच्याच नावाने चालत आहे व प्रत्येक लसीपासून लॉकडाऊनपर्यंत ‘मोदी नामा’चाच उत्सव सुरू असताना राज्यांना मदत करून उत्सवाचे रंग अधिक तेजोमय करणे हे केंद्राचेच कर्तव्य ठरत नाही काय? राज्यातील विरोधी पक्षाने दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची ही बाजू भक्कमपणे मांडली तर राज्यहिताचे श्रेय त्यांनाच मिळेल व लॉकडाऊन झाले तरी जनतेला दिलासा देता येईल, असा खोचक सल्लाही शिवसेनेनं दिला आहे.

‘व्यापार, उद्योग, राजकारण जिथल्या तिथं राहील. माणूसच जिवंत राहिला नाही तर काय कराल?’ असा प्रश्न देखलं शिवसेनेने केला आहे. कोरोनामुळे राज्याची स्थिती गंभीर आहे. आणि यावर राजकारण करू नका असं मुख्यमंत्र्या अनेक वेळा त्यांच्या मुलाखती दरम्यान सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *