शिवसेनेचा छटपुजेला पाठिंबा, तर मनसेची ‘ही’ मागणी

2019 च्या निवडणुकीत उत्तर भारतीय मतांसाठी राम मंदिराच्या मुद्द्यानंतर शिवसेनेकडून आता छटपूजेला पाठिंबा देण्यात येत आहे.
उत्तर भारतीयांचा सण छटपूजेला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवला. ठाण्यात शिवसेनेकडून छटपूजा महोत्सवासाठी शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले, तर दुसरीकडे मनसेने गणेशोत्सवाप्रमाणे छटपूजेसाठी कृत्रिम तलाव उभारावी अशी मागणी केली आहे.
मनसेच्या वतीनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महापालिकेकडे मागणी करण्यात आली. गणेशोत्सवावेळी कृत्रिम तलाव उभारला मग छटपूजेसाठी का नाही? असा सवाल मनसेनं उपस्थित केला आहे.