शिवसेनेचा अयोध्या दौरा पुढे गेला

शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्य पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, शिवसेनेचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यसभा निवडणूक लागल्याने शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनात बदल करण्यात आले आहेत.
आदित्य ठाकरे १० जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, आता शिवसेनेचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. कारण १० जून रोजी राज्यसभेच्या निवडणुकींसाठी मतदान आहे. राज्यातील सहा जागांसाठी हे मतदोन होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला असून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख शनिवारी शिवसेनेच्या जाहीर सभेत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शनिवारी शिवसेनेची सभा
शिवसेनेची १४ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी शिवसेनेचे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ‘तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या, दात पाडायंच काम मी करून दाखवतो’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाजातले वाक्य ऐकू येत आहे. तसेच १४ मे रोजी मी अनेकांचे मास्क उतरवणार आहे, असेही ते मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.