शिवसेनेचा जन्म माझ्यासमोर – पक्षप्रमुख

‘संजय राऊत यांनी फादर्स डेचा उल्लेख केला आणि होय, माझ्या फादरनेच शिवसेनेला जन्म दिला. बाहेर बरेच पित्रपक्ष असल्याचे सांगत आहे, पण माझ्या आजोबांनी काही तसं शिकवलं नाही. फक्त माझ्या पित्याचा हा पक्ष आहे एवढंच मला माहिती आहे’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. ५६ वर्षांपूर्वी शिवसेना स्थापन झाली त्यावेळीचा दिवस आजही आठवतो. एक वन बीएचके खोलीत बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. त्यावेळी आम्ही लहान भावंड होतो. त्यावेळी माझं वय फक्त ६ वर्ष होतं. माझ्यासमोर शिवाजी महाराज की जय म्हणून नाराळ फोडलं होतं. त्यावेळी नाराळच्या पाण्याचे शिंतोडे माझ्यावर उडाले होते, आज स्वप्नातही वाटलं नव्हतं ते शिंतोंडे मला भिजवून टाकतील.
गेल्या ५६ वर्षांत अनेक संकटे आली पण शिवसेना कणखरपणे उत्तर देत आली आहे आणि देत राहील. पक्षासाठी वार झेलणाऱ्यांना विनम्र अभिवादन, गेल्या जीवाला जीव देणारे शिवसैनिक मिळाळे त्यांच्याच जीवावर शिवसेना उभी राहिली. ५६ वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, घाम गाळला, त्यांच्यामुळे आज ही शिवसेना उभी आहे. असे म्हणत सर्व शिवसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.