Wed. Aug 10th, 2022

गोव्यात शिवसेनेचा डिजिटल जाहीरनामा प्रसिद्ध

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा डिजिटल जाहीरनामा घोषीत करण्यात आला. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

भाजपसोबत असलेल्या मैत्रीमुळे इतकी वर्षे आम्ही गोव्यावर लक्ष केंद्रीत केले नव्हते. मात्र, मित्रानेच पाठित खंजीर खुपसल्याने आम्ही आता आमची ताकद दाखवणार आहोत आणि येणाऱ्या काळात गोव्यातील प्रत्येक निवडणूक लढणार आहोत, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

काय आहे शिवसेनेचा गोवा विधानसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा?

  • आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार.
  • तालुका स्तरावर युवा पिढीच्या फिटनेसच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती ठिकाणी व्यायामशाळा/ओपन जिम उपलब्ध करणार.
  • राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्याकरिता व्यवस्था निर्माण करणार.
  • स्थानिकांना ८० टक्के आरक्षित नोकऱ्यांसाठीच्या कायद्याची सक्त अंमलबजावणी करून त्यामध्ये असंघटित व कंत्राटी कामगारांचा समावेश करणार आणि भूमिपुत्रांना न्याय देणार.
  • एनडीआरएफच्या धर्तीवर आपतकालीन सेवेकरीता त्वरीत सुरक्षा रक्षक मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचा प्रशिक्षित गट तयार करणार.
  • राज्यात २०० ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे स्थापन करणार.
  • निराधार योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.