Fri. Sep 30th, 2022

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे, ठाकरे गट आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरुन जुंपली आहे. शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट आग्रही आहे. याप्रकरणी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून आज उच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता ‘प्लान बी’ तयार ठेवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

जर दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क उपलब्ध झालं नाही, तर दुसऱ्या मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिवसेनेनं प्लॅन बी तयार ठेवल्याची माहिती एबीपी माझाला सुत्रांनी दिली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स, गिरगाव चौपाटी, शिवसेनाभवनसह काही पर्याय शिवसेनेनं तयार ठेवल्याचं कळतंय. आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय झाल्यानंतरच शिवसेना आपले पत्ते उघडणार असल्याची माहिती मिळत आहे.

दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्ष वाढला आहे. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांनाच मेळाव्यासाठी आणण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान, याबाबत रणनिती आखण्यात आल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.

2 thoughts on “शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

  1. Hello! Someone іn my Myspace ɡroup shared this weЬsitе
    with us so I came to take a look. I’m definitely loving the information. I’m book-marking and will be
    tweeting this to my followers! Excellent bloɡ and superb design.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.