Jaimaharashtra news

मेलेल्या मराठा मनाला उर्जा देण्याची शक्ती “छत्रपती शिवाजी महाराज” या महामंत्रात

छत्रपती संभाजीराजेंनी ट्विटरवर वाघा बॉर्डरवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये छत्रपती संभाजीराजेंसोबत सेल्फी घेत आहेत.

तसेच कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला, अशी घोषणा देण्यात येत आहेत.

छत्रपती संभाजीराजे आज मंगळवारी वाघा बॉर्डरवर बिटिंग द रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी आले होते. संभाजीराजे आल्याची माहिती मिळताच तेथील लोकांनी संभाजीराजेंच उत्साहात स्वागत केलं.

तसेच महाराजांच्या नावाने घोषाने परिसद दुमदुमला.

काय म्हणाले संभाजीराजे ?

लोकांचं प्रेम, आत्मियता पाहून माझं मन भारावले. डोळे अक्षरश: पाणावले, असल्याचे संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्राच्या मायभूमिपासून हजारो किलोमीटर दूर, आमच्या रणमर्द मावळ्यांचा उत्साह, त्यांची माझ्याविषयीची प्रीती मनाला शिवणार नाही तर काय? असंही ते म्हणाले.

त्यांनी आपल्या या भावना ट्विटद्वारे मांडल्या आहेत.

यापेक्षा मोठे भाग्य जगात नाही

लोकं आजही जीव ओवाळून टाकतात या छत्रपती घराण्यावर. माझा जन्म या घराण्यात झाला यापेक्षा मोठे भाग्य जगात कोणतेही नसल्याचे संभाजी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय…! भारत माता की जय..! वंदे मातरम.!

दरम्यान छत्रपती संभाजीराजेंनी सुवर्ण मंदिराचेही दर्शन घेतले.

देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीच्या जोरावर. संत नामदेवांनी घुमान मध्ये राहून केलेलं प्रबोधन असेल, किंवा नववे शीख गुरु गुरु गोविंदसिंहांना महाराष्ट्रात मराठ्यांनी केलेल्या सहकार्य असेल या दोन्ही मूळे सांस्कृतिक आणि पराक्रमी एकोपा जपला गेला आहे, असं ट्विट खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.

Exit mobile version