Sun. Sep 19th, 2021

शिवम पाटिलनं सोडलं लैंगिक आरोपांवर मौन मेधाच्या आरोपांना दिलं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई 31 मे: छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोंमधून प्रसिद्ध मिळवणारा शिवम पाटिल हा सध्याला चर्चेत आला आहे. मराठमोळा अभिनेता शिवम पाटील (Shivam Patil) सध्या बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवमने छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर जरी काम केलं असलं तरी पाहिजे तशी प्रसिद्ध त्याला मिळाली नाही. शिवम हा तीन वर्षांपूर्वी तो ‘अय्यारी’ (Aiyaary) या सुपरहिट चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्यानं एक लहानशी भूमिका साकारली होती. मात्र त्याच्या या भूमिकेसाठी समिक्षकांनी त्याचं कौतुक केलं होतं. त्यामुळे त्याला आणखी मोठ्या भूमिका साकारण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अभिनेत्री मेधा शंकरनं (Medha Shankar) हिने शिवमवर गंभीर आरोप केल्यामुळे त्याला काम मिळेनासं झालं. गेल्या काही काळापासून तो नैराश्येत आहे. पण अखेर त्यानं स्वत:ची संपूर्ण घुसमट सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं मेधाच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवमनं इन्स्टाग्रामद्वारे स्वत:च्या मानसिक स्थितीबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “मेधा आणि माझं रिलेशनशिप अत्यंत टॉक्सिक होतं. ती सतत माझा अपमान करायची. माझ्या शरीरयष्टीवर विनोद करायची. तिनं अनेकदा माझं मानसिक आणि शारिरीक शोषण केलं आहे. माझ्या वस्तु ती तोडायची. ज्या गोष्टींसोबत माझं भावनिक नातं होतं अशा गोष्टी तिनं माझ्या डोळ्यांसमोर नष्ट केल्या. या संपूर्ण प्रकारामुळं मी त्रस्त होतो. पण तिच्याबाबत मी कोणाकडे तक्रारही करु शकत नव्हतो. कारण मला माझं करिअर संपण्याची भीती वाटत होती. किंबहुना ती भीती मेधानच माझ्या मनात निर्माण केली होती.” “पण एकेदिवशी या त्रासातून मुक्त होण्याचा निर्णय मी घेतला. तिच्या पासून वेगळं झालो पण तरी देखील तिनं त्रास देणं सोडलं नाही. जर मी आमच्या नात्याविषयी बाहेर कुठेही काही बोललो, कोणाकडे तक्रार केली तर माझं करिअर संपू शकतं. अशी अप्रत्यक्ष धमकीच तिनं मला दिली होती. गेली दोन वर्ष मी नैराश्येत होतो. आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या मनात अनेकदा येऊन गेला.” अशा आशयाची एक लांबलचक पोस्ट त्यानं लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं मेधासोबत सुरु झालेल्या रिलेशनशिपपासून अगदी ब्रेकअपपर्यंतच्या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. तसेच याबद्दल शिवमने मुंबई पोलिसांकडे कायदेशीररित्या तक्रार देखील दाखल केली आहे. पोलीस लवकरच या प्रकरणी कारवाई करतील अशी अपेक्षा त्याला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *