Wed. Jun 29th, 2022

शिवभोजन योजनेला ‘या’ दिवसापासून सुरुवात होणार

महाराष्ट्रातील गरजू जनतेसाठी असलेल्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ 26 जानेवारीपासून होत आहे. याबाबतची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्रालयात आज अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री छगन भुजवळ बोलत होते.

या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वैधमापनशास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

अशी असेल शिवभोजन थाळी

30 ग्रामच्या 2 चपात्या

100 ग्रॅम भाजीची वाटी

150 ग्रॅम भात

100 ग्रॅम वरण

राज्य सरकारने जाहीर केलेल्या जीआरनुसार दुपारी १२ ते २ वेळेतच या योजनेला लाभ मिळणर आहे.

राज्य सरकारच्या जीआरनुसार दुपारी १२ ते २ या दरम्यान शिवभोजन थाळी मिळणार आहे. या योजनेत सर्वाधिक थाळ्या मुंबई उपनगर मिळाल्या आहेत.

राज्य सरकारच्या जीआरमध्ये जिल्हानिहाय मिळणाऱ्या थाळीची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उपनगराला सर्वाधिक म्हणजेच १५०० थाळ्या मिळणार आहेत.

तर सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या २ जिल्ह्यांना सर्वात कमी म्हणजेच १५० थाळ्या मिळणार आहेत.

ही योजना ३ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेसाठी ६ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.