Mon. Dec 6th, 2021

‘जय भवानी… जय शिवाजी’च्या गजरात रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

किल्ले रायगडावर आज 344 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. या सोहळ्याला खासदार संभाजी राजे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.

 

किल्ले रायगडावर सकाळपासून हजारो शिवभक्तांनी गर्दी करत ‘जय भवानी… जय शिवाजी’चा गजर सुरु केला. या सोहळ्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं.

 

रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज उभारून सोहळ्याची सुरुवात झाली. खासदार संभाजी राजे यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आलं.

 

आज संध्याकाळी 4 वाजता शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *