Sun. Jun 13th, 2021

खडसे परिवाराला आणखी एक धक्का!

मुक्ताईनगर मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी बघायला मिळत आहेत. आज खडसेंच्याऐवजी खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे- खेवळकर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर युती असतानाही शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र आहे.

मुक्ताईनगरचं राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या यादीमध्ये खडसे यांचे नाव नसल्याने भाजपा त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप खडसे समर्थक करत आहेत.

आज भाजपची चौथी यादी जाहीर झाली.

त्यामध्ये खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे खेवळकर यांना भाजपाने अधिकृत उमेदवारी दिली आहे.

या धक्क्यातून खडसे परिवार सावरत नाही, तोपर्यंत पुन्हा एकदा भाजपला आणि खडसे परिवाराला आणखी धक्का बसला आहे.

राज्यात युती असताना मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

पाठोपाठ तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर मध्ये भव्य अशी मिरवणूक काढली. शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यामध्ये संपूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते आणि चंद्रकांत पाटील यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचे चित्र बघायला मिळालं.

त्यामुळे राज्यात युती असली तरी मुक्ताईनगर मध्ये युतीची विभागणी झाल्याचं बघायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असला, तरीसुद्धा शिवसेनेची मोठी शक्ती त्यांच्या पाठीमागे असल्याने खडसे परिवाराला पुन्हा एकदा अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *