Sat. Jun 6th, 2020

शिवसेनेने भाजपला कधी दगा दिला नाही- उद्धव ठाकरे

युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. 135-135 हा मीडियाने ठरवलेला फॉर्म्युला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात भाष्य केलंय. शिवसेनेच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लवकरच युतीची घोषणा होणार असल्याचं सुतोवाच त्यांनी केलंय.

युतीवर वेगवेळ्या बातम्या येत आहेत त्यामुळे मी गोंधळलेलो आहे, असा टोला लगावत लोकसभेआधीच युतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे, तुम्हीच शिवसेनेची यादी तयार करा, असाही टोला त्यांनी लगावला.

“शिवसेना भाजप मध्ये कोणतीही खळखळ नाही”

‘आरे’मध्ये मेट्रो शेडला आमचा विरोध आहे, असं स्पष्ट करत नाणार बाबतीत आम्ही तिथल्या जनते सोबत आहोत असंही त्यांनी म्हटलंय.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जमल्यास मी आयोध्येला जाईन, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

हे सरकार बहुमताचं नव्हतं, पण शिवसेनेने भाजपला कधी दगा दिला नाही याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिलीय.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किशोर तिवारी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *