Wed. Jun 29th, 2022

शिवसेनावासी झालेल्या सचिन अहिरांकडे मोठी जबाबदारी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

सचिन अहिर यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. सचिन आहेर यांना शिवसेनेनं नवी जबाबदारी सोपवली आहे.

सचिन आहेर Sachin Ahir Shivsena’s Deputy leader यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपनेतेपद हे अतिशय मानाचे आणि महत्वाचे पद समजले जाते.

सचिन अहिर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर लगेचच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदनही केलं. यासंदर्भआत त्यांनी ट्विट केलं आहे.

आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम कराल, असा विश्वास सचिन अहिर यांच्या प्रति आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

सचिन अहिर यांनी मुख्यंमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांचे आभार मानले. तसेच लोकांसाठी अधिकाअधिक काम करेन असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेत प्रवेश करण्याआधी सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्वाचे नेते होते.

ते राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष होते. तसेच त्यांनी याआधी गृहनिर्माण खात्याचे मंत्रिपद भूषवलं आहे.

आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणू आणण्यात सचिन अहिर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.